शुक्रवार, १० जुलै, २०१५

मराठी कविता

           “आयुष्याची कविता”
बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं.....जगायला गेलं तर दु:खातही सुख असतं......चालायला गेलं तर निखारेही फुले होतात.... तोंड देता आले तर संकट ही शुल्लक असतं....वाटायला गेलं तर अश्रुत ही समाधान असतं....पचवायला गेलं तर अपयश ही सोप असतं....हसायला गेलं तर रडणेही आपलं असतं... बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोप असतं....